सिद्धिविनायक शेतकरी गट किलज यांच्या वतीने आपत्तीग्रस्त कुटुंबाना करण्यात आली मदत. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 15, 2020

सिद्धिविनायक शेतकरी गट किलज यांच्या वतीने आपत्तीग्रस्त कुटुंबाना करण्यात आली मदत.

 सिद्धिविनायक शेतकरी गट किलज यांच्या वतीने आपत्तीग्रस्त  कुटुंबाना करण्यात आली मदत.

राम जळकोटे-तुळजापूर    गेल्या ४ दिवसापासून तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक गावांना चांगलंच झोडपले आहे.यामध्ये तुळजापूर तालुक्यातील किलज येथील नदिलगत घरे असलेल्या कुटुंबाना यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये कसलीही जीवितहानी झालेली नसून येथील कुटुंब हे सुरक्षित ठिकाणी आहेत.यामध्ये या कुटूंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या कुटुंबाना या कठीण काळात आपलाही मदतीचा वाटा असावा या हेतूने किलज येथील सिद्धिविनायक शेतकरी गट किलज यांच्या वतीने या कुटुंबाना रु.१०,०००  च्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.यामध्ये या कुटुंबाना मदत करण्यात आली आहे. भारत विश्वनाथ सांगावे आणि राजेंद्र चंद्रकांत बिडवे यांच्या वतीने आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली आहे.यातून शांतिर पटणे ,बळीबा पटणे ,या कुटुंबाना एक प्रकारचा आधार देण्याचे काम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment