Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नुकसानीचा पंचनामा करताना एकही शेतकरी वंचीत ठेवू नका आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले.

 

नुकसानीचा पंचनामा करताना एकही शेतकरी वंचित ठेवू नका आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले.

 घाईगडबडीत प्रस्ताव न करण्याच्या प्रशासनाला सुचना

प्रतिक मिसाळ -साताराअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे . सातारा आणि जावली तालुका हा डोंगरी भाग आहे . या परिसरात पावसामुळे भात , सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . तसेच काही भागात नाचणी भुईमूग , ऊस याही पिकांचे नुकसान झाले आहे . शेतक ? याची पिके शेतातच नष्ट झाली आहेत . त्यामुळे प्रशासनाने ६५ मी.मी. पर्जन्यमानाचा निकष न लावता आणि प्रस्ताव तयार करुन पाठवायचाय म्हणून घाईगडबड न करता गांभिर्याने पंचनामे करावेत . पंचनामा करताना एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी , अशा सक्त सुचना आ श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या . अतिवृष्टीमुळे सातारा आणि जावली मतदारसंघातील असंख्य शेतकऱ्यांची भात , सोयाबीन यासह नाचणी , भुईमृग , ऊस आदी पिके नष्ट झाली असून शेतक ? यांचे मोठे नुकसान झाले आहे . नुकसानीचे पंचनामे योग्य पध्दतीने होवून शेतक ? यांना शासनाची मदत मिळावी यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली . प्रत्यक्ष शेतात जावून आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिका ? यांना पंचनामे करताना कोणीही वंचीत राहू नये याबाबत सुचना केल्या सातारा तालुक्यातील कण्हेर , वेळेकामथी , चोरगेवाडी आदी परिसरात पाहणी करताना आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम , पंचायत समितीच्या सभापती सौ सरिता इंदलकर , तहसिलदार आशा होळकर सहायक गटविस्तार अधिकारी संजय ढमाळ , मंडल कृषी अधिकारी संतोष पवार बी एन . केवटे , ए.के पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते . जावली तालुक्यातील मोरावळे व परिसरातील पिक नुकसानीची पाहणी करताना आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या समवेत तहसिलदार राजेंद्र पोळ गट विकास अधिकारी सतीश बुध्दे , तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह मंडल अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहायक आणि शेतकरी उपस्थित होते . शेती पिके शेतातच नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे . ज्या भागात ६५ मी मी पाऊस झाला असेल त्या भागातील पंचनामे करण्याचा शासनाचा निकष आहे . असे असले तरी अनेक गावांमध्ये ६५ मी मी पाऊस झाला नसला तरीही पाऊस , वादळवारे यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे शासनाचा हा निकष न लावता प्रशासनाने सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत . सरकारने आदेश दिला म्हणून प्रस्ताव पाठवायचे म्हणून घाईगडबडीत कसेतरी पंचनामे करुन कागदी घोडे पुढे सरकवू नयेत , अशा सक्त सुचना आ शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या . तसेच सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन सुयोग्य पध्दतीने प्रस्ताव शासनाकडे सादर करा आणि हे करताना नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचीत राहू नये , नंतर कोणात्याही शेतक ? याची तक्रार येवू नये याची काळजीपुर्वक खबरदारी घ्या , असेही आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकारी यांना सांगीतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies