मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट खोपोलीने जपली सामाजिक बांधिलकी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट खोपोलीने जपली सामाजिक बांधिलकी

 मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट खोपोलीने जपली सामाजिक बांधिलकी


रक्तदान शिबिराचे केले आयोजन


महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट खोपोली ने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत अत्यंत तातडीने थैलेसीमिया आजाराने ग्रस्त अनाथ मुलांसाठी रक्ताची आवश्यकता असल्याने सर्वोदय हॉस्पिटल तसेच समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.


मुस्लिम कम्युनिटी हॉल पंत पाटणकर चौक खोपोली येथे  शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 110 दात्यांनी रक्त देऊन समाजिक सदभाव जपला.
"रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान" या सूत्रांनुसार तीन महिन्यापूर्वी रक्तदान शिबाराचे आयोजनात शेकड्याने रक्तदात्यांनी रक्तदान  केलेले असताना तातडीची गरज लक्षात घेऊन अवघ्या काही तासांच्या मुदतीत दुसऱ्या शिबाराचे आयोजन करण्याची हिंमत करून 110 रक्तदाते एकत्र आणण्याची किमया  पार पाडली. या आयोजनाचे निमित्ताने  मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन-खोपोली या संस्थेचे सर्वच स्थरावर कौतुक केले जात आहे.


 खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष - अतिक खोत, खोपोली नगर पालिकेचे नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, खालापूर तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अबू जळगावकर तसेच ट्रस्टचे अनेक जेष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी या आयोजनासाठी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment