पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या बिलाचे तब्बल साडेतीन कोटी रुपये केले कमी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 4, 2020

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या बिलाचे तब्बल साडेतीन कोटी रुपये केले कमीपुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या बिलाचे तब्बल साडेतीन कोटी रुपये केले कमी

मिलिंद लोहार-पुणेकोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनाही करोना रुग्णावर उपचार करण्यासाठी परवानगी दिलीय. पण काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णांलयांकडून आकारण्यात येणाऱ्या जास्त रकमेच्या वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांनी दिलेल्या १९५१ बिलांची तपासणी झाली आहे. त्यातून सुमारे साडेतीन कोटी रुपये हे कमी करण्यात आले आहेत.

रक्कम कमी करण्यात आलेल्या वैद्यकीय बिलांमध्ये पुणे शहरातील ५००, पिंपरी-चिंचवडमधील ९२६ आणि ग्रामीण भागातील ५२५ बिले आहेत. जास्त रकमेची आकारणी केल्याबाबत आतापर्यंत पुणे शहरातील ८३ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


खासगी रुग्णालयांकडून जास्त दराने वैद्यकीय बिलांची आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये उपायुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टर यांचा समावेश आहे. या पथकांकडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण केले जाते. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या आतापर्यंत १९५१ बिलांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी रुपये कमी करण्यात आले आहेत. वैद्यकीय बिलांच्या तपासणीमुळे रुग्णांना घरी सोडण्यास किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह ताब्यात मिळण्यास विलंब लागू नये, म्हणून एक तासात पूर्व लेखापरीक्षण पूर्ण करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment