समाजातील अन्याय दूर करण्यासाठी शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार गरजेचा.
हाथरस येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या
अत्याचाराचा तासगाव येथे निषेध
सुधीर पाटील-सांगली
तासगाव वंचित बहुजन आघाडी च्यावतीने हाथरस येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या
अत्याचाराचा तासगाव येथे निषेध बैठक पार पडली. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या
घटना घडत आहेत. हे दुर्देवी आहे. समाजातील अन्याय दूर करण्यासाठी शाहू, फुले आंबेडकर चे विचार गरजेचे आहे असें प्रतिपादन बैठकीत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
कठोर कायदयाची अंमलबजावणी करावी व हाथरस घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत न्याय हक्कासाठी एकत्र येण्याची भूमिका यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जोतिराम जाधव , प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष सुधीर पाटील, शिवसेना शहर प्रमुख संजय दाजी चव्हाण, म्हेतर वाल्मिकी समाज तालुका प्रमुख मोझेस म्हेतर, प्रकाश कांबळे, शरद शेळके, वंचित बहुजन आघाडी चे राजेश गायगवाळे, उमर फारूक ककमरी,शेखर पावशे, केतन माने, दिलीप माळी, अर्जुन हजारे , मनीषा मस्के, महावीर कांबळे, प्रशांत कदम, प्रमोद क्षीरसागर, मुनिर सुल्ताने, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ.विवेक गुरव होते तर सदर बैठक वंचित बहुजन आघाडी पुणे पदवीधर उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी आयोजित केली होती. बैठकीच्या शेवटी हाथरस येथील पीडित व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.