मराठा आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत प्रस्तावीत पोलीस भरतीस स्थगिती द्यावी-मराठा क्रांति मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

मराठा आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत प्रस्तावीत पोलीस भरतीस स्थगिती द्यावी-मराठा क्रांति मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन.

 मराठा आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत प्रस्तावीत पोलीस भरतीस स्थगिती द्यावी-मराठा क्रांति मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन.

   सुधीर जाधव-सांगली     मराठा आरक्षणाचा निर्णय येईपर्यंत प्रस्तावित पोलीस भरतीस स्थगिती द्यावी  तसेच मुख्यमंत्री यांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन स्थगिती आदेश उठविण्यासाठी प्रयत्न करावेत ,मराठा विद्यार्थींची शैक्षणिक सवलती एस ई बी सी प्रवर्गानुसार चालु ठेवाव्यात तसेच मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करण्यात यावेत या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांति मोर्चा बांबवडे यांचेवतीने बांबवडे गावातील सकल मराठा समाजाचे  विजय जाधव,विजय पवार,संजय पवार,उदय पवार,दीपक पवार,अजय पवार,बापु भोसले,श्रीकांत गायकवाड,शुभम पवार यांनी तहसिलदार पलुस यांना देण्यात आले.मराठा समाजाच्या या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेपर्यंत पोहचविण्याची विनंती तहसिलदारांना केली.

No comments:

Post a Comment