पहिल्यांदाच कोव्हिड १९ रॅपिड अँटिजेन तपासणी अहवाल कोरा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

पहिल्यांदाच कोव्हिड १९ रॅपिड अँटिजेन तपासणी अहवाल कोरा

 पहिल्यांदाच कोव्हिड १९ रॅपिड अँटिजेन तपासणी अहवाल कोरा


 रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव माणगांवकरांसाठी आनंदाची बातमी दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड १९ रॅपिड अँटिजेन तपासणी अहवाल मध्ये पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी आले आहे. दिनांक ९ ऑक्टोबर तपासणी अहवालात एकही रुग्ण पाॅझिटिव आढळला नाही, पहिल्यांदाच असे घडले आहे. या दिवशीच्या अहवालात एकुण १५ चाचणी पैकी १५ निगेटिव्ह ( रिपोर्ट निल आला ) आहे. तसेच दि. १० ऑक्टोबर एकुण २२ तपासणी पैकी २१ निगेटिव्ह तर केवळ १ पाॅझिटिव आढळला अशाच प्रकारे तपासणीत निगेटिव्हचे (नकारात्मक) प्रमाण सातत्याने राहिले तर आपली नवरात्र, दसरा, दिवाळी आनंदात सकारात्मक ( पाॅझिटिव्ह ) जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. 


         असे जरी असले तरी थोडासा हलगर्जीपणा सुध्दा महागात पडू शकतो असे जाणकारांचे मत आहे. यासाठीच अति उत्साह नको, काळजी घेणे महत्वाचे आहे. जसे कि सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करणे, गर्दी टाळणे, स्वतः सुरक्षित रहा काम करा व इतरांचीही काळजी घ्या, हाच मंत्र आपल्याला या संसर्गापासून वाचवू शकतो. तसेच सध्या वातावरणातही अनाकलनिय तापमान बदल होत आहेत. ऑक्टोबर हिट सुरु होत असून नुकतेच चित्रा नक्षत्र सुरु झाले भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक कोरोना आकडेवारी मात्र चिंतनिय असून अजूनही संकट पूर्णतहा टळले नाही असच बोलल जात आहे.

No comments:

Post a Comment