कोरोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक नर-मादी धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

कोरोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक नर-मादी धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत

 कोरोनामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक नर-मादी धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत


राम जळकोटे-उस्मानाबाददरवर्षी नळदुर्ग ता. तुळजापूर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात तमाम पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱे नर मादी धबधबे पासाळ्यात कधी सुरू होतात या कडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. पर्यटक नर मादी धबधबे कधी सुरु होतात या प्रतिक्षेत असतात. परंतु यावर्षी उलटी गंगा वहातानात दिसते आहे. अता नर मादी धबधबे सरते शेवटी आलेल्या पावसाने वाहत असून ते पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून देशात लाँकडाऊन पुकारण्यात आले होते. आता अनलाँकडाऊन  असले तरी तिर्थक्षेत्र मंदिर, पर्यटन स्थळे, सिनेमागृह वगेरे खुले करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नळदुर्ग येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेला भुईकोट किल्ला पर्यटकासाठी खुला करण्यात आलेला नाही. यावर्षी पाऊस  बऱ्यापैकी झालेला आहे.


सरत्या पावसाने नळदुर्ग व परिसरात जोरदार हजेरी लावल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण भरले असून किल्ल्यातील नरमादी धबधबे ओसांडून वहावू लागले आहेत. परंतु चणे आहेत पण दात नाहीत, दात आहेत पण चणे नाहीत अशी अवस्था कोरोना मुळे पर्यटकांची झालेली आहे. इच्छा असून देखील पर्यटकांना नरमादी धबधब्याचे नयनरम्य चित्र पाहता येत नाही. कोरोना मुळे नरमादी धबधब्याना पर्यटकांची प्रतिक्षा करावी लागते आहे.   तरी देशातील पर्यटन स्थळे, तिर्थक्षेत्र मंदीरे जनतेसाठी खुली करावीत, अशी मागणी जोर धरत आहे..

No comments:

Post a Comment