सापडलेले पाच लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम संबंधितांना पोहोच करणाऱ्या प्रशांत सकट यांच्या प्रामाणिकपणाबद्दल इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे यांच्याकडून सन्मान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

सापडलेले पाच लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम संबंधितांना पोहोच करणाऱ्या प्रशांत सकट यांच्या प्रामाणिकपणाबद्दल इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे यांच्याकडून सन्मान

 सापडलेले पाच लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम संबंधितांना पोहोच करणाऱ्या प्रशांत सकट यांच्या प्रामाणिकपणाबद्दल इतिहास संशोधक डॉ  श्रीमंत कोकाटे यांच्याकडून  सन्मान

सुधीर जाधव-पलुस सांगली सांडगेवाडी-तालुका,पलूस जिल्हा- सांगली, येथील प्रशांत सकट यांच्या प्रमाणिकपना बद्दल सार्थ अभिमान वाटतो,

आज अनेक लोक पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत कोट्यधीश अब्जाधीश मोठ्या पगारदारांना देखील पैशाचा मोह आवरत नाही अशा काळामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या व रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रशांत सकट यांना रस्त्यावरती 5 लाख 70 हजार रुपये सापडले तेव्हा त्यांनी सोशल मीडियात याबद्दलची माहिती देऊन संबंधितांनी ओळख पटवून पैसे घेऊन जावेत असे आवाहन केले, अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील पैसे परत करणाऱ्या प्रशांत सारख्या प्रामाणिक लोकांमुळेच आज जग चालत आहे सर्व क्षेत्रात प्रशांत सारखे प्रामाणिक लोक आहेत प्रशांतचा प्रामाणिकपणा निस्वार्थपणे नव्या पिढीला समजायला हवा म्हणून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी प्रशांत  यांचा पलूस येथे सत्कार केला प्रशांतला दिलेली बक्षिसाची रक्कम देखील त्याने नाकारलीय अशा प्रशांतचा  आम्हाला सार्थ अभिमान वाटतो प्रशांतचा प्रामाणिकपणा सर्व महाराष्ट्रभर घेऊन जाणार असल्याचे डॉ श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.

 यावेळी  भरतसिह, इनामदार, विनायक गोंदिल,अँड दीपक लाड,माजी सैनिक माणिक सावत,निवास सावत,पोपटराव सूर्यवंशी, प्रा दिपक रणदिवे , कुमार जवीर सह नागरिक उपस्थित होते.                                                                                                                                                                 

No comments:

Post a Comment