पावसाची दमदार बॅटिंग निमणी येथील पूल पाण्याखाली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 15, 2020

पावसाची दमदार बॅटिंग निमणी येथील पूल पाण्याखाली

 

पावसाची दमदार बॅटिंग निमणी येथील पूल पाण्याखाली


सुधीर पाटील-सांगलीअवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील अनेक पूल व बंधारे पाण्याखाली गेले आहेत . परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे नदी ,नाले ,ओढे भरून वाहत आहेत . अनेक ठिकाणी ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक बंद झालेली आहे .अनेक विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत .शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे .दोन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे येरळा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आलेले आहे .व ते पाणी निमणी येथील पुलावरून वाहत आहे .त्यामुळे निमणी पाचवा मैल रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे . तासगाव शहराला पाणीपुरवठा  होणारी पाईपलाईन निमणी पुलावरून गेली असून पुलावरील आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ती पाईपलाईन विस्कळीत झाली असून तासगाव शहराचा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे .अनेक नदी काठच्या मोटरी पाण्याखाली गेल्या आहेत .परिसरातील शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे .अनेक मोठे लाकडाचे ओंडके पाण्यातून वाहून आलेले आहेत .येराळा पत्रातील पाणी बाळासो बापुसो पाटील ,अशोक कलगोंड पाटील  ;यांच्या द्राक्ष बागेमध्ये गेल्याचे दिसून येत आहे .  तसेच शिवाजी ज्ञानू पाटील ,चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्या ऊसामध्ये पाणी उभा राहिलेले आहे .काही घरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे .निमणी ,तुरची रस्त्यावरील असणारे ओढ्याचे पाणी राहुल चौगुले यांच्या द्राक्षबागेमध्ये गेले आहे. अवकाळी मुळे  ,खानापूर ,सोलापूर ,सांगली या परिसरामध्ये  वादळाचा  मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला  आहे तसेच नियमानुसार पंधरा ऑक्टोंबर मध्ये बंधा-याची दारे आडवणे काम करायचे असते परंतु या अवकाळीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे . संपूर्णं बंधाऱ्याची दारे का काढली नाहीत असे विचारले असता ते म्हणाले पूर्वी नियमानुसार सर्व दारे काढली व नंतर पाऊस पुरेसा झाला नाही त्यामुळे थोडे तरी पाणी शेतीसाठी लोकांना वापरता यावे यासाठी पुर्ण दारे काढली नाहीत व ताकारी योजनेचे ही पाणी आपन घेतले होते अशी माहिती पाटबंधारे विभागाचे आधिकारी एस.वाय. सावंत यांनी दिली .

No comments:

Post a Comment