चंद्रकांत अधिकारी यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन ! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

चंद्रकांत अधिकारी यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन !

 चंद्रकांत अधिकारी यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन !

महाराष्ट्र मिरर टीम-माणगांव साई पचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ साई संचलित लोकमान्य ज्ञानदिप विघामदीर साई या विघालयातील सहशिक्षक  चंद्रकांत अधिकारी सर यांना सन 2020-2021 या वर्षीचा रायगड जिल्हा परिषदेकचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून हार्दिक अभिनंदन होत आहे.

चंद्रकांत अधिकारी सर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या आत्मिकबलाच्या  व जिद्दीच्या जोरावरच शिक्षण घेऊन आपले ध्येय पुर्ण केले.

   शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम व ज्ञानदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 विध्यार्थी ,संस्था व सामाजिक विकासात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल  साई पचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ साई संस्थेेचे अध्यक्ष गजानन अधिकरी , लोकमान्य ज्ञानदिप विघामदीर साई विघालयातील सर्व शिक्षक ,

शिक्षकेत्तर कर्मचारी , उपाध्यक्ष बळीराम लाड, भिवाजी कठे, सुभाष जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका  सुजाता पाटील, सहकारी प्रशांत अधिकारी ,प्रमोद देशमुख, राजु मोरे, इब्राहिम जुवले ,विघानंद अधिकारी,प्रकाश टेटविलकर, साई विभागातील मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खास अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment