माणगांव बाजारपेठेत खड्डे.. दुचाकी अपघाताची दाट शक्यता.. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 18, 2020

माणगांव बाजारपेठेत खड्डे.. दुचाकी अपघाताची दाट शक्यता..

 माणगांव बाजारपेठेत  खड्डे.. दुचाकी अपघाताची दाट शक्यता..संतोष सुतार-माणगांवमाणगांव शहर हे राष्ट्रीय मुंबई - गाेवा महामार्गाच्या मध्यावर बाजारपेठ वसलेले  तालुका ठिकाणाचे शहर आहे. मुंबई गाेवा राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणात माणगांव शहराला बाह्यवळन रस्ता कळमजे गाेद पुलाजवळुन थेट ढालघर काेकण रेल्वे ब्रीज असा देण्यात आला आहे. तुर्तास वाहतुक मात्र माणगांव शहर बाजारपेठेतुन मुंबई गाेवा महामार्गावरुन हाेत असते.  सुट्टीचे वार शनिवार रविवार या दिवशी वाहतुक काेंडीने माणगांवकर जनता त्रस्त असताना बाजारपेठेच्या मध्यस्थानी बिकानेर मिठाईवाले दुकानासमाेर व हाँटेल आेम माधवाश्रम यांच्यासमाेर भले माेठे खड्डे पडले आहेत. यातच ट्रॅफिक मधुन मार्ग काढत जाणारा दुचाकीस्वार किंवा तीन चाकी वाहन यांचा अपघात दुर्घटना घडणे नाकारता येऊ शकत नाही. 

 माणगांवातील बाजारपेठ मध्यस्थानी रस्त्यावरील खड्डे  दुरुस्ती करुन घ्यावी अशी मागणी  नागरिकांकडुन केली जात आहे.

मुंबई गाेवा महामार्ग जरी माणगांव शहरातुन बाह्यवळन घेऊन जात असला तरी माणगांव तालुक्याची व तालुक्यातील संपुर्ण ग्रामीण भागाची बाजारपेठ ही माणगांव शहरच असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी लाेकांची वर्दळ ही माणगांव शहरातच असते.काही नागरिक प्रवासी तीन चाकी वाहन व दुचाकीस्वार यावरुन प्रवास करत असतात. अश्या खड्यातुन अपघात हाेऊ शकतात.


 माणगांव बाजारपेठेतुन वाहन चालविताना खड्ड्यांमुळे माेठ्या वाहनांच्या समांतरस्थित वेगावर मर्यादा येऊन जागीच थांबवावे लागते. यामुळे छाेटी वाहने व दुचाकी यांचा अपघात घडु शकताे. याकरीता राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबधित प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रीत करुन माणगांव बाजारपेठेतील हायवेवरील खड्डे बुजवावे...

श्री विजय वाठाेरे वाहनचालक,
माणगांव,खांदाड.

No comments:

Post a Comment