काकल ग्रुप ग्रामपंचायत उसर बौद्धवाडी येथील विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

काकल ग्रुप ग्रामपंचायत उसर बौद्धवाडी येथील विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

 काकल ग्रुप ग्रामपंचायत  उसर बौद्धवाडी येथील विदयार्थांना
 शैक्षणिक साहित्य वाटप

संतोष सुतार-माणगांव       माणगाव तालुक्यातील काकल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उसर बौद्धवाडी मध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या विदयार्थ्यांना मुंबई ग्रामस्थांच्या वतीने शैक्षणिक साहित्य उसर ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले होते. उसर बौद्धवाडी येथे ऑगस्ट महिन्यापासून विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील ग्रामस्थांनी बुद्ध विहारात गावातील मुलांसाठी शाळा सुरु केली. या शाळेतील विदयार्थ्यांना गावातील सुशिक्षित मुले वेळ काढून शिकवित आहेत.

     त्यामूळे  बौध्द विकास मंडळ मुंबई उसर बौद्धवाडी यांच्या पदाधिकारी यांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता त्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य ग्रामस्थांकडे सुपूर्द केले. सदरचा साहित्य वाटप कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमेच्या दिवशी गावातील बुद्ध विहारात करण्यात आला. लॉक डाऊनच्या काळात गावात शाळा सुरु करुन या उसर गावाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच गावातील अंतर्गत असणारी कामे गाव विकास समितीच्या माध्यमातून केली जात असून येथील विदयार्थांना शासकिय शाळा बंद असून गावामध्ये शिक्षण उपलब्ध झाल्याने आनंद वाटत असून शैक्षणिक साहित्य मिळल्यामूळे विदयार्थी व पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.   सदरचा शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम गाव विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग मोरे, सचिव सुमिता सचिन तांबे, अनिल मोरे तसेच गावचे अध्यक्ष हरिश्चंद्र तांबे, उपाध्यक्ष नथुराम मोरे, सचिव पांडुरंग जाधव, उपसचिव मोहन तांबे, मुलांना मार्गदर्शन करणारे समिर मोरे, सचिन तांबे , साक्षी मोरे, प्राची मोरे, सिमरन तांबे, शुभम तांबे व विदयार्थ्यांना विहारामध्ये शिकविणारे गावातील विदयार्थी तसेच गावातील ग्रामस्थ व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment