Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नवरात्रीमध्ये भाविकांना तुळजापूर नगरीत नाही प्रवेश:live होणार आईतुळजाभवानीचे दर्शन.

 नवरात्रीमध्ये भाविकांना तुळजापूर नगरीत नाही प्रवेश:live होणार आईतुळजाभवानीचे दर्शन.


राम जळकोटे- तुळजापूर



                        यंदाच कोरोनाच महाभयंकर संकट हे देवदेवतांच्या  दारी ही आलं आहे.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचे महाराष्ट्राच आराध्यदैवत. कुलुस्वामीनी आईतुळजाभवानी चे दर्शन हे भाविकांना प्रत्यक्ष रुपात मिळणार नसून ते live च्या रुपात www.shri tuljabhavani.org.या मंदिर कमिटीच्या अधिकृत संकेतस्थळ वर घेता येणार आहे. अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार .सौदागर तांदळे यांनी दिली आहे. गेली ६ महिने पासून अनेक धार्मिक स्थळे हे या महामारीच्या काळात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार  बंद करण्यात आले होते. अनेक भाविकांनी हे कोरोनाच सावट आता नवरात्री पर्यंत तरी जाईल आणि आई तुळजाभवानी चे दर्शन आम्हाला घेता येईल या आशेने आतुर होते.परंतु या वाढत्या कोरोनाच्या   प्रादुर्भावामुळे ते घेणे अशक्य झाले आहे. मंदिर कमिटीच्या वतीने भाविकांसाठी आपल्या मोबाईल वरती आई तुळजाभवानी चे दर्शन घेण्याकरिता सोय करण्यात आली आहे.

या नवरात्रीच्या काळात मेळावा, आणि समारंभ मध्ये ५० व्यक्तींच्या पुढे प्रवेश मिळणार नाही. सामाजिक बांधिलकी राखत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा नवरात्र सोहळा पार पडणार आहे.

 


सर्व सार्वजनिक मेळावे , कार्यक्रम यावरती निर्बंध घालण्यात येणार आहेत.या नवरात्रीच्या काळात भक्तांना आणि भाविकांना तीर्थ क्षेत्र तुळजापूर नगरी मध्ये प्रवेश मिळणार नाही. असे आदेश जिल्हाधिकारी. दिवेगावकर यांनी दिले आहेत.श्री. आई तुळजाभवानीची शारदीय पूजा पूर्वापार होणारे प्रमाणे विधी पूजा, यासाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.तर Vip आणि पत्रकार यांना उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, आणि तहसीलदार तांदळे यांच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies