लोकसेवा फाउंडेशनच्या श्रमदान चळवळीत ५५ माता-भगिनी आणि बांधवांचा सहभाग
राम जळकोटे-तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील लोकसेवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काल दि. ८ नोव्हेंबर रोजी तुळजापूर शहरात स्वछता मोहीम राबवण्यात आली होती.यामध्ये शहरातील होतकरू ५५ माता भगिनी तसेच बांधवांनी सहभाग घेतला होता. यात तुळजापूर शहरातील लोहिया विभागातील सर्व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.यात सहकार्य केलेल्या ५५ माता भगिनी तसेच बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.लोकसेवा फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या श्रमदान चळवळीतील भगिनींना लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष. पंकज शहाणे यांच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले.