Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अखेर जिल्हा कारागृह परिसरातील बांधकाम निबंध शिथील आ शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश ; जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार

अखेर जिल्हा कारागृह परिसरातील बांधकाम निबंध शिथील आ शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश ; जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार

प्रतीक मिसाळ -सातारा


सातारा जिल्हा कारागृह हे पुर्णपणे नागरी वस्तीत असून कारागृहाच्या आसपास हजारो लोक वास्तव्यास आहेत . या परिसरात पाचशे मीटर अंतरापर्यंत कसल्याहीप्रकारचे बांधकाम करण्यास मज्जाव होता . यामुळे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत होता . हे निर्बंध शिथील करण्यासाठी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार सन २०१८ मध्येच विधान परिषदेचे सभापती ना श्रीम रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या दालनात संबंधीत अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती . याच बैठकीत पाचशे ऐवजी शंभर मीटर अंतर करण्याचा निर्णय झाला होता . तत्कालीन जिल्हाधिकारी यांनाही भेटून आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबतचा निर्णय लागू करण्यास सांगितले होते . उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला , याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले असून पालिका प्रशासनाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा , असे आ शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे . आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन जिल्हा कारागृहासंदर्भात सन २०१८ मध्ये अधिवेशनादरम्यान मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात तत्कालीन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक झाली होती . या बैठकीस ना . रामराजे , रणजित पाटील , आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुणे -१ कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक विठ्ठल जाधव , टाउन प्लॅनिंग विभागाचे अव्वर सचिव शिंदे , सातारा जिल्ह्याचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे , साताऱ्याचे तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , सातारा नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते . दिवसेंदिवस सातारा शहराच्या नागरी वस्ती वाढत असून शहराच्या मध्यभागी , भरवस्तीत जिल्हा कारागृहाची इमारत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत याच ठिकाणी पोलीस मुख्यालय , शहर पोलीस ठाणे सातारा नगरपरिषद कार्यालय , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय यासह अनेक शासकीय , निमशासकीय , खाजगी कार्यालये , संस्था , शाळा आणि विविध व्यावसायिक दुकाने आहेत . शासनाच्या निकषांनुसार जिल्हा कारागृहाच्या पाचशे मीटर परिसरात नवीन बांधकाम करण्यावर निर्बंध आहेत . त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे . कारागृह हे शहराच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने त्याचे दुरोगामी परिणाम शहराच्या विकासावर होत आहेत . कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने संबंधीत कुटूंबाला घराचा विस्तार करणे अनिवार्य असते . मात्र जिल्हा कारागृहामुळे अशा अनेक कुटुंबांना त्यांच्याच जागेत नवीन घराचे बांधकाम अथवा विस्तार करता येत नसल्याचे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत सांगितले . त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली होती . त्यानंतर जिल्हा कारागृह परिसरातील बांधकामाबाबतचे निबंध शिथील करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून तशा सुचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे रणजित पाटील यांनी आ . शिवेंद्रसिंहराजे यांना कळवले होते . त्यानुसार आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी सदर प्रश्न तातडीने सुटावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन त्यांना दिले . यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते . वास्तविक २०१८ मध्येच निबंध शिथिल करण्याचा निर्णय झाला होता जिल्हा प्रशासनाकडून त्यावेळी दिरंगाई झाली मात्र आता विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला आणि सातारकरांची मोठी समस्या दूर झाली आहे . याबद्दल तमाम सातारकरांच्यावतीने आ शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले असून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार सातारा पालिकेला आहेत .त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि जिल्हा कारागृह परिसरातील निर्बंधांमुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा , असे आ शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies