काँग्रेस चे देशाचे नेते अहमद पटेल यांचे निधन अत्यंत वेदनादायी: प्रशांत यादव - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

काँग्रेस चे देशाचे नेते अहमद पटेल यांचे निधन अत्यंत वेदनादायी: प्रशांत यादव

 काँग्रेस चे देशाचे नेते अहमद पटेल यांचे निधन अत्यंत वेदनादायी: प्रशांत यादव

ओंकार रेळेकर-चिपळूण


ज्‍येष्‍ठ नेते व खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

खा.अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. खा. अहमद पटेल यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी प्रतिक्रिया चिपळूण तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment