मुरूड बाजारपेठ येथे इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही
अमूलकुमार जैन-मुरुड
या इमारतीला आचानक आग लागल्याने शेजारील आसणा-या नागरिकांनी आपल्या घरातुन बाहेर येवुन ही गंभीर आग विझवण्यासाठी नगरपरिषदेतील कर्मचारी अभिजित कारभारी व नितेश माळी यांना फोन करून घटनास्थळीची माहिती देण्यात आली या दोघांनी विलंब न लावता अग्निशमनदलाची गाडी घेवुन घटनास्थळी येवुन इमारतीला लागल्या आगीवर ताबा मिळवण्यासाठीही बरेच प्रयत्न करावे लागले.
अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला व स्थानिक नागरिकांना ही आग विझवण्यात यश आले. तरी तोपर्यंत आगीत इमारतीत असलेले भाजी व फळे व इतर भस्मसात झाले. ही माहिती मिळताच मुरूड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी येवुन मदत कार्य केले.
या इमारतीत वास्तव कोणीही करत नसल्या तरी या इमारतीच्या मालकाने एका गरीब भाजी विक्रेते भाजी व फळे विकण्याची परवानगी दिली होती भाजी विक्रेते- पाटील.रोजच्या प्रमाणे आपला भाजी विक्रेतेचा व्यवसाय बंद करून उरलेली भाजी व फळे इमारतीच्या तळ मजल्याच्या हाॅल मध्ये ठेवुन घरी गेला.परंतु रात्रीच्या दरम्यान या इमारतीला आग लागुन या गरीब भाजी विक्रेतेचे आर्थिक नुकसान झाले.
आगीच कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.