शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी स्कुल चले हम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी स्कुल चले हम

 शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी स्कुल चले हम

कर्जत मधील शिक्षक व प्राध्यापक वर्ग सज्ज ;

कोरोना टेस्टिंगसाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा

नरेश  कोळंबे -कर्जत

 कोरोना काळात शाळा बंद असताना शाळेची प्रक्रिया ऑनलाइन चालू होती. शासनाने दिवाळीनंतर शाळा सुरु करणार असल्याचे  जाहीर केल्यानंतर व चालू करण्याची  मान्यता मिळाल्यानंतर मागील दोन दिवसांपासून कर्जत मधील सर्व शिक्षकांनी आपली टेस्ट करून घ्यायला सुरुवात केली आहे. व त्यामुळे या शासन निर्णयाला चांगला  प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना काळात बंद असलेल्या शाळा चालू कधी होतील?  याकडे शिक्षक व पालक या दोघांचे लक्ष लागून होते.  शाळा सुरू होणार या निर्णयाचे स्वागत करत कर्जतमधील विविध शाळांतील शिक्षकांनी आज कर्जत उपजिल्हा रुग्णालय व कशेळे उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन आपल्या RT-PCR टेस्ट करून घेतल्या. सदर टेस्ट विनामूल्य करण्यात आल्याने शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या टेस्ट करण्यासाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा दवाखान्यात लागलेल्या दिसल्या.  शाळा सुरू होणार याची खुशी शिक्षकांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होती. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना त्यांचं घर चालवणे या काळात कठीण झाल्याने सर्व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक शाळा सुरू कधी होणार  ? याकडे लक्ष देऊन होते.  शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर शिक्षकांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केल्याने 19 तारखेपासून दवाखान्यामध्ये शिक्षकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत

 


  शिक्षकांनी शासन  निर्णयाला  चांगला प्रतिसाद दिल्याने कर्जत भागातील जनतेकडून समाधान व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कर्जत तालुक्यात कमी झाल्याने कर्जतकर सुखावले आहेत. पण दुसरी  लाट येणार या भीतीने चिंतातुर देखील आहेत. असे असतानाही बरेच पालकांनी पुढाकार घेत शाळा सुरू कराव्यात, यासाठी पसंती दर्शवली व त्यानुसार कर्जत मधील विविध माध्यमिक शाळा व कॉलेज 23 तारखेपासून सुरू केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment