Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उद्या पासून माथेरान -अमंन लॉज मिनी ट्रेन शटल सेवा सुरू होणार! मिनीट्रेनच्या स्वागतासाठी माथेरानकर सज्ज

 उद्या पासून माथेरान -अमंन लॉज मिनी ट्रेन शटल सेवा सुरू होणार!
मिनीट्रेनच्या स्वागतासाठी माथेरानकर सज्ज

चंद्रकांत सुतार-माथेरान

      माथेरानच्या नगराध्यक्षा  प्रेरणा प्रसाद सावंत तसेच माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत , माजी नगराध्यक्ष  विवेक चौधरी यांनी मध्य रेल्वेचे DRM शलभ गोएल यांची माथेरान  दस्तुरी शटल सेवा सुरू करण्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती,  मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे शिफारस पत्र आणि  नगराध्यक्षा यांचे मागणी पत्र महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव  संजय कुमार यांना पत्र देण्यात आले तसेच त्यावेळेस मंत्रालय येथे उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे  नगराध्यक्षा आणि माजी नगराध्यक्ष यांचे सोबत मुख्य सचिव  संजय कुमार यांच्या दालनात समक्ष भेट घेऊन पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार उपलब्ध होणेसाठी शटल सेवेचे महत्त्व पटवून दिले त्यास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य सचिव यांनी रेल्वे प्रशासनास तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश  आपत्ती मदत व पुनर्वसन सचिवालयात दिले त्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना अमनलॉज ते माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या पत्राद्वारे दिले आहेत   उद्या  बुधवार  4 /10/2020 रोजी  माथेरानची मिनी ट्रेन शटल  दस्तुरी ते माथेरान  सेवा सुरू होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies