वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्याला अटक
मिलिंद लोहार-पुणे
तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून नुकतीच अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक देवकर भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर थांबला असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार निशांत काळे आणि पोलीस शिपाई सुधीर डोळस आणि किरण काटकर यांना मिळाली. त्यानुसार खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी सापळा लावून देवकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. देवकर याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.