भूमी पॉटरीला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, November 9, 2020

भूमी पॉटरीला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट

 भूमी पॉटरीला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट

महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक

ओंकार रेळेकर-चिपळूण


मौजे धोपावे ता. गुहागर येथील उद्योजिका सौ.रसिका दळी यांच्या भुमी पॅाटरी व क्ले स्टेशन या उद्योग कारखान्यास रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असतांना भेट दिली. महिलांमार्फत मातीची भांडी बनविण्यासारखा आगळा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय याचा आनंद आहे. समाजमाध्यमांवर याबाबतचा व्हिडीओ बघितला होता तेव्हापासुनच येथे येण्याचा विचार करीत होते. यासारखे पर्यावरण पुरक व प्रदुषण विरहीत असलेले प्रकल्प कोकणाला पर्यटन समृध्द करतील आणि त्यातूनच रोजगार निर्मिती होवून कोकणाचा आर्थिक विकासही होईल. 


प्रसंगी  राजन दळी,  प्रिती दळी, अजय बिरवटकर, खादी ग्रामउद्योगचे अधिकारी राजा आरेकर, सरपंच सदानंद पवार आदी. मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment