Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोल्हापूरच्या मयत भागूबाई घुरके यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च ऑल इंडिया धनगर समाज करणार...

कोल्हापूरच्या मयत भागूबाई घुरके यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च  ऑल इंडिया धनगर समाज करणार...

     दोन्ही मुली घेतल्या दत्तक ...

दत्ता शेडगे-खोपोली

कोल्हापूर जिल्ह्यातील म्हासुरली धनगर वाडा येथील भागूबाई घुरके यांना तात्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा व नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, 

  त्यांचा घरी  ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी भेट देऊन सांत्वन करत भागूबाई  घुरके यांच्या दोन्ही मुली व त्यांच्या दिराच्या दोन्ही मुले अश्या एकूण चार मुले दत्तक घेत   त्यांचे  पदवी पर्यंतचे संपूर्ण खर्च ऑल इंडीया धनगर समाज महासंघ व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट करणार  असल्याची माहिती या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिली, 

आमचा धनगर समाज आजही हा डोंगराच्या कड्याकपारित अडकून पडलेला असून तो आज जीवन मरणाची लढाई लढतोय पण सरकारला व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना कशाचेच सोयरसुतक राहिलेल नाही, आज समाजाला कोणी वाली उरला नाही, अशीही टीका ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सरकार वर केली  ,   तर येथील मधला धनगर वाडा, रातबीचा धनगर वाडा येथील 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले, 

  यावेळीं ऑल इंडिया धनगर समाजाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शंकर पुजारी, संपर्क प्रमुख मंगेश हजारे, युवक आघाडी अध्यक्ष तानाजी बोडके उपस्थित होते, 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies