पालकमंत्री आदिती तटकरें करणार विविध विकास कामांचे उदघाटन व भुमिपुजन
रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव
माणगांव नगरपंचायत मार्फत पाच वर्षात सुमारे १७ कोटींची कामे झाली आहेत. आता नव्याने मंजुर १ ते १७ प्रभागांमध्ये एकुण ४ कोटी १३ लाख ८० हजार ७१५ मात्र रक्कमेच्या विकास कामांना सुरुवात होणार आहे. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात सहा प्रभागांमध्ये राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी या विकास कामांचे भुमिपूजन व उदघाटन कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ११.३० वाजता प्रभाग क्रमांक ११ येथे विरेश्वर नगर - कुणबी भवन रस्त्याचे भुमीपुजना पासुन कार्यक्रम सुरु होऊन प्रभाग क्रमांक ७ सिटी ब्राइट इमारत जवळ रोहेकर काॅलनी येथे तसेच प्रभाग क्रमांक ४ उतेखोल गांव, प्रभाग क्रमांक ५ कचेरी रोड, प्रभाग क्रमांक १५ खांदाडगाव, प्रभाग क्रमांक १६ जुना माणगांव, तसेच प्रभाग क्रमांक १२ नाणोरे या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप होणार असुन यानंतर पालकमंत्री माणगांव नगरपंचायतला भेट देणार आहेत
नगरपंचायत हद्दीत शासनाचे विविध योजनातून मंजुर रक्कम १] सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान ( जिल्हा स्तर ) कामांची संख्या ३ मंजुर रक्कम ७६ लाख ३४हजार ३७२रुपये मात्र, २] माणगांव नगरपंचायत करीता नविन नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय अनुदान कामांची संख्या ४ मंजुर रक्कम ७१ लाख ३० हजार ३६२ मात्र, ३] रस्ते अनुदान नगरपंचायत फंड (पाणी पुरवठा) रक्कम २९ लाख ७८ हजार ५८७ मात्र, ४] १४ वा वित्त आयोग कामांची संख्या ५३ मंजुर रक्कम २ कोटी ३६ लाख ३७ हजार ३९४ मात्र अशी आहे. आणखी काही विकास कामांचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्तेही नजिकच्या काळात होणार असल्याची माहीती नगराध्यक्षा योगिता चव्हाण आणि उपनगराध्यक्ष दिलीप जाधव यांनी पत्रकारांना सोबत घेतलेल्या सभेत दिली आहे. या कार्यक्रमास सर्व नगरसेवक तसेच नागरिकांनी उपस्थिती रहावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
सुरुवातीच्या काळात नगरपंचायत नविन होती परंतु नंतर नगरपंचायतीला मुख्याधिकारी, अभियंता (इंजिनियर) व सर्व गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर विकास कामाला गती मिळाली असल्याची माहीती या वेळी त्यांनी दिली आहे. उपनगराध्यक्ष दिलीप जाधव यांनी या भुमिपुजन संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करताना सांगितले कि हा मंजुर झालेला शासकिय निधी सर्व प्रभागात समान वाटप करण्याला प्राथमिकता दिली असुन या कार्यक्रमास सर्व पक्षिय नगरसेवकांना निमंत्रित केले आहे. यामध्ये कोणताही राजकिय हेतु नसल्याचे त्यांनी पत्रकारांजवळ स्पष्ट केले आहे.