रायगड जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायतना आठ लाखांचा दंड....
वेळेत सुधारणा न केल्यास दर माह दोन लाख रूपये दंडाचा बडगा ......
अरुण जंगम-म्हसळा
झपाट्याने वाढत्या शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना या कचऱ्याची विल्हेवाट शास्ञोयुक्त पद्धतीने लावण्याचे आदेश केंद्रीय हरिद लवादाच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील पोलादपुर, माणगाव, म्हसळा, तळा नगर पंचायत आणि श्रीवर्धन नगर परिषद यांना आपल्या शहरातील नागरी घनकचऱ्याची विल्हेवाट शास्ञो युक्त पद्धतीने लावण्याचे आदेश मार्च २०२० रोजी देण्यात आले होते .
माञ संबंधित संस्थांनी या गोष्टींची दखल घेतली नसल्याने केंद्रीय हरिद लवादाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलादपुर, माणगाव, तळा, म्हसळा नगर पंचायत आणि श्रीवर्धन नगर परिषद यांना आठ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून संबंधित संस्थांनी डिसेंबर २०२० पर्यंत नागरी घनकचऱ्याची विल्हेवाट शास्ञो युक्त पद्धतीने लावला नाही तर संबंधित संस्थांना दर महा दोन लाख रूपये आकारला जाईल असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी बोलताना सांगितले आहे.