हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंचची मागणी
चंद्रकांत सुतार - माथेरान
वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची १०८ वी जयंती भाईंच्या जन्मगावी माथेरान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १डिसेंबर १९१२ रोजी क्रांतिसूर्य विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांचा जन्म माथेरान या निसर्गरम्य गावी झाला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य लढ्या मध्ये उडी घेतली भाईंनी आझाद दस्ता नावाची संघटना काढून तरुणांची फौज ब्रिटिशांविरोधात तयार केली होती. एकतर स्वातंत्र्य किंवा स्वर्ग या उद्देशाने इंग्रजांन विरोधात भाईंनी लढा दिला. आज सकाळी आठ वाजता विध्यमान नगराध्यक्ष याच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली,हुतात्मा स्मारक येथे श्री गणेश पेंटना कोतवाल यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिकांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या स्मारकातून मशाल फेरीचे माधवजी गार्डन कडे प्रस्थान झाले, भाई कोतवाल यांच्या निवास स्थानी त्याच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष श्री आकाश चौधरी याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , माधवजी गार्डन येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास कोतवाल ब्रिगेड चे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .
उपस्थिती सन्माननीय लोकप्रतिनिधीनि वीर भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली.स्वातंत्र सैनिकांच्या स्तंभास श्रीमती आशाताई कदम अध्यक्ष अश्वपाल संघटना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शासकीय कार्यक्रम झाल्या नंतर, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हु. भाई कोतवाल विचारमंच तफे मागणी करण्यात आली.
वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच चे अध्यक्ष नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी भाईंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले , मंगेश शिंदे, विजय कदम , विठ्ठल पवार व बिलाल महाबले यांनी स्वतंत्र सैनिकांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण केला. विचारमंच चे उपाध्यक्ष प्रकाश सुतार भास्कर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.
सदर अभिवादन कार्यक्रमात नगरसेवक नगरसेविका
नगरपालिका कर्मचारी वर्ग ,सन्मानीय नागरिक उपस्थित होते.
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात शिक्षण विभागाने भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र्य लढ्याची सविस्तर माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश करावा. जेणेकरून भाईंच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीस मिळू शकेल.
सुनील शिंदे--विचार मंच सचिव
सुनील शिंदे--विचार मंच सचिव