Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

 दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र मिरर टीम -म्हसळामुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेजवळील लाखपाले येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडवले. यात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती महाड तहसील कचेरी येथील वाहनचालक कृष्णा भागवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 


आज (4 डिसेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. लोणेरेजवळील लाखपाले येथे दुचाकीस्वार कृष्णा भागवत यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. महाड येथून काम आटोपून ते त्यांच्या अ‍ॅक्टीव्हा गाडीने गोरेगाव येथील आपल्या घरी जात होते. यादरम्यान अपघात झाला. भागवत यांच्या डोक्यावरुन वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या ढिसाळ कामामुळे बर्‍याच ठिकाणी दुचाकीवरुन प्रवास करणे जिकरीचे होत आहे. या ढिसाळ कामामुळे आज आणखी एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies