पार्थला आंतरराष्ट्रीय गणित ऑलीम्पीयाडमध्ये सुवर्णपदक.
राम जळकोटे-तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील पार्थ किलज येथील पार्थ उमेश भोईटे या मुलाने गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलीम्पीयाड परीक्षेत सुवर्णपदक मिळवून गावाचे नाव रोशन केले आहे.सोलापूर जिल्ह्यातील डोड्डी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उमेश भोईटे यांचा हा मुलगा असून पद्मश्री सुमितीबाई इंग्लिश मिडीयम स्कूल सोलापूर येथे त्याचे शिक्षण सुरू आहे.पार्थ हा इ.२ मध्ये शिकत आहे.पार्थ च्या यशाचे गावपातळीवर असणारे सर्व व्हॉट्सऍप ग्रुप आणि तसेच मान्यवर मंडळी यांच्या कडून भरभरून कौतुक केले जात आहे.या यासाठी परिश्रम घेतलेले त्याचे शिक्षक आणि वडील यांनीही पार्थचे कौतुक केले.