Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कालवा सफाई न करताच सुरु; शासनकर्ते गारठलेत

 कालवा सफाई न करताच सुरु; शासनकर्ते गारठलेत

सायपणलाही गळती पाणी जाते वाया

रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांवमाणगांव शहरातुन वाहणारा कालवा आज सुरु झाला आणि सकाळी हवेत गारवां आला. अकरा वाजेपर्यंत माणगांवात एकीकडे गुलाबी थंडी आणि दुसरीकडे कालव्यातील घाणीची बेसूरी चर्चा जनतेमधुन ऐकावयास मिळत आहे. यंदा कालव्याची साफसफाई डागडुजी न करताच कालवा सुरु झाल्याने वाहणाऱ्या पाण्यातील घाण कचरा, चक्रीवादळात कालव्यात कोसळलेली झाडे अजुनही तशीच आहेत. तसेच उतेखोल-भादवचा पुल म्हणजेच सायपणला भादाव स्मशान भुमी कडील एका टोकाला ही गळती लागुन पाणी वाया जात आहे. कालवा लिकेज कसा थांबणार ? या सर्व परिस्थितीकडे पाहून संबंधित कालवा प्रशासन गारठले कि काय ? अशी प्रतिक्रिया माणगांवकरां मधुन ऐकावयास मिळत आहे.


दरवर्षी कालवा दूतर्फा सफाई होते परंतु अलिकडे अशी सफाईच करत नाहीत. संबंधित प्रशासनाकडे कर्मचारी तुटवडा आहे. साहेब लोक लक्ष देत नाहीत. या कालव्याच्या सफाईचे टेंडर निघते. मात्र सफाई उरकली जाते. असे बोलले जाते. गेल्या वर्षी माणगांव कालवा रोड डांबरीकरणाचे कारणास्तव शहरातील कालवा सफाई अर्धवटच केली होती. त्यामुळे कालव्याच्या अंतर्गत रान माजले आहे. घाणकचरा यात टाकल्याने डासांचा प्रादूर्भाव शहरात वाढला आहे. स्वच्छते-पायी आपल्या घरांचे परिसरात करवंट्या, डबडी टाकू नका डेंग्यू, मलेरिया डासांची पैदास होते. अस सांगणारे प्रशासन एवढ्या मोठ्या कालव्यात अस्वच्छतेने डासांची पैदास निमुटपणे कसे काय पाहते ? असा सवाल ऐरणीवर आला आहे.


नगरपंचायत प्रशासन माणगांव नगरीच्या स्वच्छतेसाठी काळजी वाहते. हा जनतेच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. मग नगरीतील या कालव्याचे स्वच्छते साठी संबंधिताना का सूचना करत नाही ? त्यांचेशी समन्वय साधल्यास हा प्रश्न सहज सुटेल अस जाणकार बोलतात. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या महत्वपूर्ण समस्ये बाबत लक्ष घालावे अशी विनंती वजा माहीती देण्यात आली होती. पंधरा दिवसापूर्वीच कालव्याचे साफसफाई संदर्भात वृत्तही वर्तमान पत्रातून प्रसिध्द झाले होते. तरिपण ही अवस्था याला म्हणावे तरी काय ! संबंधित शासनाची उदासिनता जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies