Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कृषी सहाय्यक रणदिवे यांनी केले मृदा दिनानिमित शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

 कृषी सहाय्यक रणदिवे यांनी केले  मृदा दिनानिमित शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

राम जळकोटे-तुळजापूर



तुळजापूर तालुक्यातील किलज येथे आज दि.५ डिसेंबर रोजी असलेल्या जागतिक मृदा दिनानिमित्त किलजमधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यात शेतजमिनींचे परीक्षण करण्यात आलेल्या आणि त्यात आढळणाऱ्या सूक्ष्म मूलद्रव्य आणि इतर घटकांचा समावेश असलेल्या जमीन आरोग्य पत्रिका   ही किलज गावात लावण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना त्याबाबतीत मार्गदर्शन ही करण्यात आले आहे.

 सन २०१७-२०१८ आणि २०१८-२०१९ या वर्षीच्या शेत जमिनीतील मातीचे परीक्षण करून प्रधानमंत्री जमीन आरोग्य पत्रिकानुसार तयार करण्यात आलेल्या गावांचा सुपिकता निर्देशांक विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली गेली आहे. 



या मार्गदर्शन पर कार्यक्रमामध्ये सुपिकता निर्देशांकानुसार शेतजमिनीत आढळलेल्या नत्राचे प्रमाण मध्यम, स्फुरदचे प्रमाण कमी, पालाश चे प्रमाण मध्यम या सरासरी निष्कर्षनुसार शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी गांधुळ खत, शेणखत हिरवळीची खते वापरावीत असे कृषी सहाय्यक.रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील नारायण सगर, हुजीर इनामदार, कल्याण मरडे, सह आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies