Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुरूड पोलीस ठाण्यात श्री गुरूदेव दत्त जयंती साजरी

 मुरूड पोलीस ठाण्यात श्री गुरूदेव दत्त जयंती साजरी

अमूलकुमार जैन-मुरुड



मुरूड शहरातील पोलीस ठाण्यातील श्री दत्त मंदिरात श्री गुरूदेव दत्त जयंती निमित्य श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजन करून गुरूदेव दत्ताची जयंती मोठ्या भक्तीभावात व उत्सवात साजरी करण्यात आली.या पुजेचा मान धनजंय धर्मा पाटील व सौ.करिश्मा पाटील यांना मिळाला.

मुरुड पोलीस ठाण्यात यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाचा गजर करण्यात आला.


यावेळी पौरोहित प्रसाद उपाध्ये यांनी श्रीदत्त महिमा बाबत उपस्थित दत्तभक्त यांना माहिती दिली की,हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.



मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली वावरत असताना सावधगिरीची उपाययोजना म्हणून शासन, प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. त्या आदेशाचे पालन करीत श्री गुरूदेव दत्तउत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मुरुड पोलीस ठाण्यात सामाजिक अंतर राखले,श्रीदत्त यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकासाठी स्टॅनिनायझर यांची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पोलीस निरीक्षक- परशुराम कांबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक-  रंगराव पवार , उपनिरीक्षक- प्रशांत सुबनावळ,  पोलीस नाईक-  राहुल थळे , पोलीस हवालदार - दिपक राऊळ  , धर्मा पाटील, पोलीस नाईक- सुदेश वाणी , पोलीस शिपाई - सुरेश वाघमारे व सुजित कवळे , संतोष माळी , महिला पोलीस निलिमा वाघमारे , पोलीस हवालदार -निलेश गिरी , पोलीस हवालदार- आस सी घरत, पोलीस शिपाई- आरती पवार , पोलीस- भाग्यश्री म्हात्रे आदिसह पोलीस कर्मचारी व होमगार्डस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies