Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ईमेज कॅलेंडरच्या माध्यमातून रायगड जिल्हयातील छायाचित्रकांना प्रोत्साहन देण्याचे काम

 ईमेज कॅलेंडरच्या माध्यमातून रायगड जिल्हयातील छायाचित्रकांना प्रोत्साहन देण्याचे काम 

अमूलकुमार जैन-अलिबागअलिबागमधील छायाचित्रकारांनी ईमेज कॅलेंडरच्या माध्यमातून रायगड जिल्हयातील छायाचित्रकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी येथील हाटेल गुरुप्रसाद येथे केले. 

अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा पार पडला.   यावेळी  रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मनोज  सानप,  भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहिते, रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हीडीओ ग्राफर्स असोसिएशनचे विवेक सुभेकर, कॉंग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले, अलिबागमधील छायाचित्रकारांनी या उपक्रमाच्या माध्यमातून एक व्यासपिठ मिळवून दिले आहे. रायगड जिल्हयाची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक वृध्दींगत होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हयात छायाचित्रकारांसाठी एक प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे असे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले.


इमेज कॅलेंडरचे हे तिसरे वर्ष आहे.  पहिल्या वर्षी अलिबागच्या वृत्तपत्र छायाचित्रकारांनी रायगडचा निसर्ग छायाचित्रकारांच्या नजरेतून असा विषय निवडला होता.  2019 च्या इमेज कॅलेंडरला रायगडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता . 2020 च्या कॅलेंडरसाठी समाज जनजागृतीचा विषय निवडला. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन ,स्वच्छता आणि वृक्षारोपण या विषयांचा समावेश होता . तसेच  2021 च्या कॅलेंडरसाठी गड आणि निसर्गचित्र हा विषय निवडला होता . सामाजिक बदलाची आणि स्वच्छतेची चळवळ तसेच गड किल्ल्यांचे महत्व समाज मनात तेवत ठेवण्याचा प्रयत्न अलिबागमधील रमेश कांबळे , जितू शिगवण आणि समीर माळोदे या तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संक्लपनेतून इमेज कॅलेंडरने दिनदर्शिकांच्या स्पर्धेत आपले स्थान पटकावले आहे. 

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक म्हणाले, अलिबागमधील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांनी ईमेज कॅलेंडरच्या माध्यमातून रायगड जिल्हयातील छायाचित्रकारांना एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे.

निसर्ग चित्र, गड किल्ले, वृक्षारोपण अशा अनेक प्रकारचे विषय घेऊन छायाचित्रकारांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे काम खऱ्या अर्थाने करण्यात आले आहे. 


छायाचित्रकारांनी रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक इमेज आपल्या कॅमेऱ्यात बंद केल्या आहेत. कॅलेंडरवरील छायाचित्रे रायगड जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्याचबरोबर आध्यात्माची देखील त्याला जोड आहे. यामुळे पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील निसर्ग पाहण्यासाठी खुणावणारी हे इमेज कॅलेंडर आहे असे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेष मोहिते यांनी सांगितले.  यावेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर, विवेक सुभेकर या मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले.इमेज कॅलेंडर ने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ७८८ छायाचित्रांमधून १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies