पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री दत्तजयंती उत्सव साधेपणाने संपन्न..
राजेंद्र पोतदार-कर्जत
यावर्षी निर्माण झालेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने जारी केलेल्या नियमानुसार सोशल डीस्टंन्सिंग पाळून, सॅनिटाइजरचा वापर करून चेह-यावर मास्क लावून पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री दत्तजयंती उत्सव साधेपणाने व धार्मिक विधीने संपन्न झाला. श्री दत्तजयंतीनिमित्त
सकाळी अभिषेक, दत्तयाग दुपारी आरती व सायंकाळी श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव, पालखी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
तसेच स्वामींच्या मुर्ती भोवती दिपमाळ लावण्यात आली होती.ह्या प्रसंगी दर्शनार्थ आलेले कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका संचिता पाटील, नगरसेविका प्राची डेरवणकर यांचा मठाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.रात्री आरतीनंतर ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. ह्याप्रसंगी विक्रांत दरेकर, अॅड. राजेंद्र निगुडकर, राजू पोतदार, अॅड.प्रदीप सुर्वे, नरेंद्र दरेकर, वत्सला वांजळे, सतिश मुसळे, दादू दरेकर,विजू दरेकर, उपस्थित होते.