Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नायं नायं म्हणत आलं आलं कारभारी; उमेदवारीसाठी इच्छुक लयभारी

 नायं नायं म्हणत आलं आलं कारभारी; उमेदवारीसाठी इच्छुक लयभारी

रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव



लय खर्च होतो मटण, दारुकाम, पार्ट्या द्याव्या लागतात. निवडणुक लढवायची आता सोपी राह्यली नायं, बक्कळ पैसा खर्च करावा लागतोय वरुन मतदान होईस्तोवर हे सगळ टीकवून ठेवाव लागतय. नायतर लगीच पलटी मारतात; बोलतात सामनेवाला उमेदवार खर्च करायला तयार आहे. बोला तुम्ही काय करतायं ? असा सुर काही मतदारांमधुन प्रत्यक्ष निवडणुक रिंगणात उघड उघड विचारला जातो, हा अनुभव कथन केला जात आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायं नायं म्हणत आलं आलं कारभारी; उमेदवारीसाठी इच्छुक लयभारी ! अशा प्रकारच्या चर्चांनी सध्या माणगांवात जोर धरला आहे. अजुनही युती संदर्भात स्पष्ठता ठरलेली नाही.

          एक प्रकारे हल्ली निवडणुक लढविणे सोपे नाही. अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ सामाजिक संपर्क व काम करण्याची पात्रता व आधी पासुनच तुमच प्रामाणिक कार्य याला कवडीचीही किंमत नसते. असच जणु एकाअर्थी सुचित करणारे सुर ऐकु येत आहेत. राजकारणात आरक्षणानंतर उमेदवार शोधा शोध सुरु झाली आहे. अगोदर पासून पुढाऱ्यां-सोबत प्रत्येक कार्यक्रमात कार्यकर्ते म्हणुन सतरंज्या उचलणाऱ्यांना अर्थात आपल्या पार्टीचे काम मनापासून करणाऱ्या नविन युवा उमेदवारांना संधी मिळणार कि जुनेच आपली घराणेशाही चालवणार ? हा खरा सवाल आहे. 

           काहीजण खुर्चीला चिकटलेत, तीनचार टर्म अर्थात पंधरा वीस वर्षांपासून उमेदवारी मिळवुन प्रभागात काम करतात. मग आता नवनविन सहकाऱ्यांना पुढे आणुन संधी का दिली जात नाही ? असा सवाल माणगांवातील काही सुज्ञ व अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नागरिकांनी सध्याच्या नगरपंचायत निवडणुक संदर्भात बोलताना उपस्थित केला आहे. मागील नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायतीमुळे काम करण्याची योग्य संधी मिळाली नाही. त्यातच जवळपास एक वर्ष सर्व अधिकारी व सोयी सुविधा मिळायला, तीन वर्ष कळायला व एकवर्ष कोरोना, नैसर्गिक आपत्ती अशी पाच वर्ष कारभार शिकण्यातच कारभारी अडकले ! अस गंमतीने बोलल जात आहे. 

           त्यामुळे कोणी कसे काम केले व आपल्या प्रभागात लोकांना किती सोयी सुविधा मिळविण्यात यशस्वी झाले, याचा लेखाजोखाच मांडला जात आहे. तसेच नगरसेवक म्हणुन निवडुण येताना दिलेली आश्वासन वा लोकसंपर्क टिकविण्यात ते कितपत यशस्वी झाले ! याचे दाखले देत, यानंतर ते निवडणुक लढवतील कि नाही? याचीही खुमासदार, खरमरित चर्चा लोकांमधुन ऐकावयास मिळत आहे. आरक्षणा मुळे महिलाराजची नांदी आहे. अशातच अनेकांना आपली उमेदवारी गमवावी लागली हे कटू सत्य आहे. पण राजकारणाची चटक लागली कि मग ती सुटता सुटत नाही. लोक यासाठी चटावलेल तोंड या अर्थाची एक म्हणं हसत हसत चटकन् उच्चारताना सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणुकीची रंगत वाढली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies