Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला,तीन जण ठार,43 जण जखमी तर 6 जण अत्यवस्थ

 रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला,तीन जण ठार,43 जण जखमी तर 6 जण अत्यवस्थ


पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर घडला अपघात


तर वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला.

अरुण जंगम-म्हसळा

-रायगडमध्ये भीषण अपघात झाला असून वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर झाला वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात झाला आहे. हा ट्रक रत्नागिरी येथून पोलादपूरला जात असताना हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन मृतदेह सापडले असून २० ते २२ लोक जखमी झाल्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना दिली आहे.


या ट्रकमध्ये जवळपास २५ लोक प्रवास करत होते.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून अंधार असल्याने अडथळा येत आहे.तर जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.
















पोलादपूर अपघात अपडेट 10 वाजून 24 मिनिटांनी


44 जखमींपैकी 12 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचार करून रत्नागिरीला पाठविण्यात आले आहे.

एका व्यक्तीला गुडघ्याला फॅक्चर आहे.त्यास महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies