खालापूर तालुक्यातील दहागाव संघर्ष समितीच्या मागे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकारी असेल.
शेतकऱ्यांवर होणार अन्याय खपवून घेणार नाही : आमदार जयंत पाटील
महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्याय खालापूर तालुक्यातील दहागावाटली शेतकारी वर्गावर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला निर्बंध घालण्यासाठी वेळोवेळी विधान परिषदेत आपण आवाज उठवला आहे आणि त्याचसाठी दहागाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जो संघर्ष उभा राहिला त्याला [पाठिंबा देण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचा निर्धार आज शासनाच्या विरोधात खालापूर तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चाचे वेळी संबोधित करणाऱ्या तडाखेबाज भाषणातून व्यक्त केला.
आमची संघर्षाची परंपरा आहे. आम्ही सिडकोचा लढा लढलो आणि न्याय मिळवून घेतला. आम्ही सेज विरुद्ध एल्गार पुकारला आणि त्यात यशस्वी झालो. आता दहा गाव संघर्ष समितीने पुकारलेला संघर्ष तडीस नेणारच असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. ज्यावेळी ज्या जमिनीवर धान्याचा एक कण पिकत नव्हता त्यावेळी कवडीमोल भावाने जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या, त्या कित्येक वर्षं ओस पडल्या होत्या मात्र आज त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असताना त्याच जमिनीला करोडोंचा भाव आलाय.
याची पूर्व कल्पना त्या जमीन खरेदी करणाऱ्या धन दांडग्यांना होती. आता शासनाकडून मूळ किमतीपेक्षा जो अधिक भाव मिळेल त्यातला ५० % टक्के वाट हा मूळ मालकाला दिला पाहिजे अशी आमची मागणी असेल. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, त्याच सोबत जमिनीचे व्यवहार करताना दलालांची लुडबुड नसावी असं आमचा आग्रह असेल असे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आणि तरुणाना विशेष करून महिलांनी एकजुटीने राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
भुसंपादन करण्याकरिता तहसीलदार यांच्या कार्यालयात बैठक न लावता गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन शासनाची भूमिका पटवून दिली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. जगातला पहिलया शेतकऱ्यांच्या संपाचे आम्ही जनक आहोत, त्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमचे अस्तित्व आहे, म्हणून आम्हाला न्याय आणि आणि हक्क कसे मिळवून घ्यायचे याची समज आहे. शासनाने आम्हाला जमेस धरून चालू नये असा खंबीर इशाराही यावेळी त्यांनी दिला. गुण्या गोविंदाने द्याल तर ठीक अन्यथा आमचे हक्क कसे प्राप्त करायचे जाण आम्हाला आहे. आम्ही सद्या सामोपचाराने घेत आहोत म्हणून मवाळ झालो असा गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी प्रतिपादन केले. हि संघर्षांची सुरवात आहे असे सूतोवाचही त्यांनी केले.
ठळक मुद्दे १ : दहागाव संघर्ष समितीचे युवा सदस्य आणि महिला जमीन आमच्या हक्काची, आमच्या मागण्या मेनी करा अश्या घोषणा देत होते.
ठळक मुद्दे २ : मोर्चामध्ये सहभागी झालेलय गावकऱ्यांनी वारकरी पद्धतीने वारीचे वातावरण निर्माण करताना तिला मृदूंगाच्या थेकायवर भजनांचे गायन केले.
ठळक मुद्दे ३ : मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्या नंतर व्यासपीठ म्हणून चक्क बैलगाडीचा झालेला वापर वातावरण निमित्ती करत होता.
ठळक मुद्दे ४ : महसूल आणि पोलीस प्रशासनाले बहुतांशी अधिकारी हे शेतकरी वर्गातले असल्याने मोर्चाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता.
ठळक मुद्दे ५ : माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पठिंबा दिल्याचे स्वागत आम जयंत पाटील यांनी केले.