तासगाव, जय शितला कोल्ड स्टोअरेज मधील रसायन युक्त बाहेर पडलेले पाणी आमचे नाही..संचालक गगन अग्रवाल. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 31, 2021

तासगाव, जय शितला कोल्ड स्टोअरेज मधील रसायन युक्त बाहेर पडलेले पाणी आमचे नाही..संचालक गगन अग्रवाल.

 तासगाव, जय शितला कोल्ड स्टोअरेज मधील रसायन युक्त बाहेर पडलेले पाणी आमचे नाही..संचालक गगन अग्रवाल.

राजू थोरात- तासगांव 


तासगाव कवठेएकंद रोडवर जय शितला कोल्ड स्टोअरेज आहे.ह्या कोल्ड स्टोअरेज विरुद्ध तेथील 2 शेतकऱ्यांनी प्रदूषण विभागाकडे ,जिल्हाधिकारी, व तासगाव तहसीलदार यांचेकडे तक्रार दिली होती. तक्रारीमध्ये रसायनयुक्त पाण्यामुळे द्राक्ष बागांची नुकसान झाले आहे असे म्हटले होते.

जय शितला कोल्ड स्टोअरेजचे संचालक गगन अग्रवाल यांनी पत्रकार परिषद बोलावून सर्व वस्तू विषद केली.सर्व पत्रकार यांना रसायन युक्त पाण्यावर प्रकिया करून कोल्ड स्टोअरेज मधील सर्व झांडांना पाणी दिले हे दाखवले.तसेच जयशीतला कोल्ड स्टोअरेज परिसरात एक 5 फुटाचा खड्डा आहे त्यात फक्त ड्रेनेज व पावसाचे पाणी साठते.ते पाणी मोटरद्वारे 1 किलोमीटर असलेल्या ओढ्यात सोडले आहे.

त्यामुळे जय शितला कोल्ड स्टोअरेजचे रसायन युक्त पाणी कोठेही मुरले जात नाही त्यामुळे ज्या 2 शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही.असेही यावेळी गगन अग्रवाल यांनी सांगितले.

उलट जय शीतला कोल्डस्टोअरेज मध्ये जास्तीत जास्त गरीब लोकांना रोजगार  आम्ही दिला आहे. हे इतर 2 शेतकऱ्यांना बघवत नसलेमुळे आमच्या जय शीतला कोल्ड स्टोअरेजची बदनामी चालू केली आहे असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे.


शासनाच्या सर्व नियमानुसार व प्रदूषण मंडळाचे नियमानुसार कोल्डस्टोरेज सुरू आहे असेही जय शितला कोल्ड स्टोअरेज संचालक गगन अग्रवाल यानी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे

No comments:

Post a Comment