मुरबाड मध्ये सिद्धगड येथे हुतात्मांना आदरांजली - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, January 2, 2021

मुरबाड मध्ये सिद्धगड येथे हुतात्मांना आदरांजली

 मुरबाड मध्ये सिद्धगड येथे हुतात्मांना आदरांजली

सुधाकर वाघ -मुरबाड
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे शनिवारी 2 जानेवारी रोजी पहाटे  6 वा.10 मिनिटांनी आमदार किसन कथोरे यांचे हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस दलातर्फे हुतात्म्यांना सलामी देण्यात आली 

  या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय भरत भगत , राजेंद्र ठाकरे , सिद्धगड स्मारक समितीचे सचिव मुरलीधर दळवी , ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर , मुरबाड तालुका भाजप अध्यक्ष जयवंत सूर्यराव , मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर तेलवणें , सामाजिक कार्यकर्ते दिपक खाटेघरे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे आदि उपस्थित होते.    कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सिद्धगड येथे मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये सुरक्षित अंतर ठेऊन हा कार्यक्रम पार पडला. रायगड जिल्ह्यातील मानीवलि येथील भरत भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना भजनाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment