पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर शहरात कडकडीत बंद
प्रतीक मिसाळ-इंदापूर
पाहा काय आहे प्रकरण इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर शहर बंद पुकारण्यात आलेला होता . इंदापूर ( पुणे ) : इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर शहर बंद पुकारण्यात आलेला होता . त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी तसंच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याने आज इंदापूर शहर 100 टक्के बंद होते . अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार दिवसभर पूर्णतः बंद होते . ( Indapur City Closed Against Indapur Pl narayan Sarangkar ) पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात . निरपराधी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात , असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड . राहुल मखरे यांनी केलाय . यासाठी त्यानी 19 डिसेंबर आमरण उपोषण सुरु केले होते . मात्र दुसऱ्याच दिवशी राज्यमंत्री भरणे यांनी मध्यस्ती करत तसंच आश्वासन देत त्या आंदोलनास स्थागिती दिली होती . यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना फोन लावला व सारंगकर यांच्यावरती काय कारवाई करता येईल ? असे विचारले . हा फोन लावण्यापूर्वी भरणे यांनी त्या फोनचा स्पीकर ऑन केला होता . त्यामुळे उपस्थित आंदोलकांना आणि पत्रकारांना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते हे काय बोलत आहेत हे सर्व तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांना ऐकू येत होते .
मोहिते यांनी सहा तारखेपर्यंत चौकशी करुन कारवाई करु तसेच कारवाई करण्याचे अधिकार माननीय पोलीस विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना आहेत असे सांगितले . यावरती भरणे यांनी सहा तारखेपर्यंत त्यांच्यावर योग्य कारवाई होईल असे आश्वासन देऊन आंदोलनात स्थगिती देण्याची विनंती केली होती त्यानंतर राहुल मखरे यांनी आंदोलन स्थगित केले होते . मात्र सहा तारीख उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याने मखरे यांनी शहर बंदची हाक दिली . या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी तसंच नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला . पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावरती जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या आठ दिवसात केव्हाही रस्ता रोको , जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलकांनी दिला आहे . या वरती आम्ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना संपर्क साधला असता , त्यांना संपर्क होऊ शकला नाही , वेळोवेळी फोन केला मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही ... एकंदरीतच या प्रकरणावर ती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ मार्ग काढावा अशी भावना समस्त इंदापूरकरांची आहे ..