राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कर्जत (तिघर) मधील सौरभ देशमुख ठरला उकृष्ट गायक
सौरभने जिंकली उपस्थितांची मने
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धा 3 व 4 जानेवारी रोजी ठाण्यात संपन्न झाली. स्पर्धेत तिघर कर्जत तालुक्यातील ओम नाद ब्रम्ह भजन मंडळातील सौरभ देशमुख उकृष्ट गायक ठरल्याने सौरभ देशमुख वर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात येत आहेत.
भारतीय संस्कृतीत संगीताला एक वेगळेच विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले असून सर्वाचा कल आपोआप संगीत क्षेत्राकडे वाढत आहे. संगीताच्या जोरावर कोणालाही आपलंस करता येते. असाच प्रत्यन स्वर्गीय वसंतराव डावखरे (ठाणे) यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धा 3,4 जानेवारी रोजी संपन्न झाल्याने या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक देखील ओम नाद ब्रम्ह भजन मंडळ (तिघर)कर्जत यांनी पटकावला मंडळात गायक - कु .सौरभ बुवा देशमुख ,पखवाज- स्वप्नील मिसाळ, तबला - चैतन्य भागवत व सर्व भजन मंडळ यांनी सादर केलं व आपल्या नावाचा ठसा राज्यस्थरीय भजन स्पर्धेत उमटवला.सौरभ देशमुखने आपल्या गायनातून सर्वाची मने जिंकल्याने त्याला उकृष्ट गायक म्हणून सन्मानित करण्यात आल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौरभला सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरवण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास प्रुमख पाहुणे म्हणून ठाणे प्रदेश सदस्य भा.ज.प तथा आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे विकास घांगरेकर, व निरंजन डावखरे व आदी मान्यवर उपस्थित होते.