जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची केली पाहणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची केली पाहणी

 जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची केली पाहणी

ओंकार रेळेकर-चिपळूणजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज अचानक चिपळूण नगरपालिकेला भेट दिली.

विविध विषयांवर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधला.चिपळूण पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर त्यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला भेट दिली.

ठेकेदार, अभियंता यांच्याकडून सांस्कृतिक केंद्राच्या कामाबाबतची माहिती जाणून घेतली. सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करू, असेही त्यांनी सांगितले.यानंतर गोवळकोट येथील पुनर्वसनासंदर्भात जागेची पाहणीही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या चिपळूण दौऱ्यामुळे शहरातील विकासाची अनेक दालने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. नगराध्यक्षा सुरेखा खराडे यांच्यासह सर्व नगरसेवक या वेळी उपस्थित होते. 

रंगकर्मी संतोष केतकर, मंगेश बापट, संजय कदम यांनीही सांस्कृतिक केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment