डोंगरी विकास समितीच्या अशासकीय सदस्यपदी कर्जतच्या दीपक श्रीखंडे यांची नेमणूक
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या अमलबजावणीकरिता शासनाच्यावतीने समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अशासकीय सदस्यपदी कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक कान्हू श्रीखंडे यांची नेमणूक करण्यात आली असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
डोंगरी भागातील सबंधीत दोन अशासकीय सदस्य तसेच एक अशासकीय महिला सदस्य ,अशा एकूण 3 अशासकीय सदस्यांची 2 वर्षाकरिता पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही नेमणूक केली आहे एकूण 11 सदस्यांची ही समिती काम करेल.
या समितीवर पालकमंत्री या अध्यक्ष असून डोंगरी भागातील आमदार हे या समितीवर सदस्य म्हणून असतील.तर अशासकीय सदस्यांमध्ये पेण येथील दयानंद भगत आणि माणगांव येथील अरुणा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.