मुरबाडमधील वंचित वाड्या -पाड्यांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्या!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

मुरबाडमधील वंचित वाड्या -पाड्यांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्या!!

 मुरबाडमधील वंचित वाड्या -पाड्यांच्या  नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्या!!

जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवार यांची पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी 

सुधाकर वाघ-मुरबाडठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाड्या आणि पाडे यांना पुरक पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळावी अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्याय सुभाष पवार यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  मुरबाड तालुक्यातील करचोंडे, झाडघर आणि येथील आजूबाजूच्या पाच गावपाड्यांपैकी जवळपास 3500 लोकसंख्या असणाऱ्या करचोंडे आणि बांगारवाडी या दोन गावांकरिता असलेली नळ योजना जुनी व जीर्ण झालेली आहे.या गावांकरिता दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत आटतात. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.या गाव पाड्यांकरिता यापूर्वी अनेक योजना केल्या परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे येथील जनतेला ,आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

   या गाव पाड्याना कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारण करण्यासाठी मुरबाड टोकावडे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचा उद्भवामधून पूरक नळ पाणी पुरवठा योजना करण्यासाठी टंचाई आराखड्यात मंजूर करण्यात आली असून यासाठी मंजुरी मिळावी म्हणून मंत्रीमहोदय आणि जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे जि.प.उपाध्याक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment