महाराष्ट्रातील पत्रकारांचा जवळचा मित्र हरपला!
पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे पुण्याच्या ससून रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास !
मिलिंद लोहार-पुणे
ममहाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचे जिवलग मित्र,एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पुणे जिल्ह्या माहिती अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारे मा राजेंद्र सरग यांचा आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले(एक अमेरिकेत)असा परिवार असून पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
राजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड,नगर,परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिकांना व महाराष्ट्रातील 150 ते 200 दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत असत. पत्रकारांचे जवळचे मित्र म्हणून ही त्यांची ख्याती होती.
राजेंद्र सरग यांनी नवीन,जुना,लहान, मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही.प्रत्येकास सहकार्य केले.त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मुंबई मंत्रालयातून सांगण्यात आले होते.
चार दिवसांपूर्वी त्यांना ताप व खोकला सुरू झाला, त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचा जवळचा मित्र कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड गेला.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीपुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.तसेच मंत्री छगन भुजबळ आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही सरग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.