माझी वसुंधरा - अभियानांतर्गत
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांचा सन्मान
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
माझी वसुंधरा अभियानांतर्गत संस्था, पदाधिकारी, अधिकारी उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी हे सदर सुरू करण्यात आले आहे.
या सदरा अंतर्गत दर शनिवारी व रविवारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान करण्यात येत आहे.
या आठवडयातील शनिवारचे मानकरी ठरले आहेत, रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील
कर्जत शहराची पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल-
▪️शहराचे हरित अच्छादन वाढवण्यासाठी 3000 स्थानिक प्रजातींची लागवड.▪️मागील 5 वर्षात केलेल्या 5000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड व संगोपन.▪️शहरामध्ये घनकचरा प्रकल्प येथे सुसज्ज असे फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आले आहे. ▪️सुमारे 1000 पवित्र तुळस वनस्पतींचे वाटप.▪️ हरित पध्दतीस प्रोत्साहित करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर पॅनेल, वर्मी कंपोस्ट बेस्ड एसटीपी प्लांट असलेली “ग्रीन बिल्डिंग” बांधली गेली आहे.▪️गरजू लोकांना मदत करण्यासाठी cloth bank- माणुसकीची भिंत संकल्पना राबविली गेली आहे.▪️इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरामध्ये सुसज्ज असे चार्जिंग पॉईंट सुरू केले आहेत. ▪️नॉन मोटरराईज वाहनांना तसेच नो Vehicle Day ला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात होती. ▪️शहरातील सर्व वॉर्ड मधील विविध भागामध्ये वायु/ हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. ▪️अपारंपरिक ऊर्जेचा वापरास चालना मिळावी म्हणून शहरात एकूण 3000 LED व 50 सोलार लाईट बसविले आहेत. ▪️बायोगेस प्रकल्पाद्वारे वीजनिर्मिती केली जात असून 150 LED दिवे प्रज्वलित केले जातात.▪️पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती वापरण्यास प्रोत्साहित करण्यात आले. ▪️इकोफ्रेंडली तलावांचा उपयोग गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी केला गेला.▪️माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरात कलात्मक चित्रे काढून जनजागृती केली जात आहे. ▪️प्रचार प्रसिध्दीसाठी व लोकसहभाग मिळविण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, जिंगल स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ▪️# Epledge अंतर्गत माझी वसुंधरा मित्र परिवार सदस्यांची संख्या एकूण 5,000 पेक्षा अधिक झाली आहे.
सगळ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झालेले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच अभिनंदन यात श्री सुदाम म्हसे अण्णा यांचे विशेष योगदान आणि मेहनत. आरोग्य सभापती आणि उपनगराध्यक्ष श्री अशोक शेठ ओसवाल आणि आरोग्य विभाग यांचेही खूप खूप अभिनंदन लवकरच कर्जतला योग्य असे बक्षीस मिळेल अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना दिली.
सगळ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झालेले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच अभिनंदन यात श्री सुदाम म्हसे अण्णा यांचे विशेष योगदान आणि मेहनत. आरोग्य सभापती आणि उपनगराध्यक्ष श्री अशोक शेठ ओसवाल आणि आरोग्य विभाग यांचेही खूप खूप अभिनंदन लवकरच कर्जतला योग्य असे बक्षीस मिळेल अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना दिली.