Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ चेक पोस्टला जि.प. अध्यक्षांची भेट

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ चेक पोस्टला जि.प. अध्यक्षांची भेट

सुधीर पाटील -सांगली


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन अंतर्गत 'ब्रेक द चेन' या धोरणानुसार महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर म्हैसाळ येथे चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. आज दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.

महाराष्ट्रात विनापरवाना व  कोविड तपासणी न करता येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करा व नंतर च प्रवेश द्या अशा सूचना पोलिस तपासणी पथकास कोरे यांनी दिल्या.

विशेषत कर्नाटकातुन महाराष्ट्रात नियमितपणे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक सुरू असते . परिणामी असंख्य प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढत आहे.हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सिमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies