शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात संधी : नंदकुमार पाटील - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, April 19, 2021

शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात संधी : नंदकुमार पाटील

 शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात संधी : नंदकुमार पाटील

उमेश पाटील -सांगलीराष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात करियर करण्याची संधी मिळाली आहे. तसेच महिलांच्या कलागुणांना वावही मिळाला आहे. पवार साहेबांच्या ध्येय धोरणामुळे राजकारणासह विविध क्षेत्रात महिला आज पुढे येताना दिसत आहेत, असे प्रतिपादन सर्वोदय साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील यांनी केले.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सौ. छायाताई पाटील यांचा पोखर्णी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार पाटील बोलत होते.

  यावेळी सर्वोदय साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील,वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा सौ. सुजाता पाटील,अनिल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, सौ रंजना जाधव ,उज्वला बादरे ,सविता  पाटील यांचेसह महिला उपस्थित होत्या.

प्रारंभी नंदकुमार पाटील यांच्या हस्ते सौ छायाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नंदकुमार पाटील म्हणाले, राष्ट्रवादी चे संस्थापक शरद पवार आणि पालक मंत्री जयंतराव पाटील यांच्यामुळे महिलांना समाजकारणात राजकारणात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळू लागली आहे. सौ छायाताई पाटील यांनी कौतुकास्पद काम केले आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांना आपल्या कामाची पोचपावती मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी सौ छायाताई पाटील यांनी नंदकुमार पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

स्वागत आणि प्रास्ताविक सौ. सुजाता पाटील यांनी केले. आभार सविता पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment