म्हसळा बाजारपेठ बंद बाबत व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन, - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

म्हसळा बाजारपेठ बंद बाबत व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन,

 म्हसळा बाजारपेठ बंद बाबत व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन,

विकेंड लॉक डाऊन वगळता ठराविक वेळेसाठी शासनाने दुकान उघडण्यास मुभा द्यावी तहसीलदार म्हसळा यांच्याकडे दिले निवेदन

अरुण जंगम-म्हसळा महाराष्ट्र राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने आधी विकेंड लॉक डाऊन होणार असल्याचे सांगितले आणि नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सरसकट लॉक डाऊन लावले आहे त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.नवीन नियमावली लावुन अत्यावश्यक सेवा वगळता छोट्या मोठ्या दुकानदारावर एक प्रकारे अन्यायच केला असल्याने व्यापारी वर्गात मोठया प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.अशा प्रकारच्या लॉक डाऊनला राज्यातील बहुतांश व्यापारी वर्गाचा विरोध आसुन सरसकट व्यापार बंदी शिथिल करून ठराविक वेळेसाठी व्यवसाय करण्यास शासनाने मुभा द्यावी आणि काही प्रमाणात शिथिलता मिळावी यासाठी म्हसळा तालुका शहरातील कापड दुकानदार,कटलरी,टपरी,इलेक्ट्रॉनिक,फर्निचर आदी प्रकारच्या व्यापारी वर्गाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना राज्यात सरसकट लॉक डाऊन बाबत काही प्रमाणात सूट देवुन शासन नियमांत शिथिलता करावी अशा प्रकारचे लेखी निवेदन दिले आहे.या वेळी तहसीलदार यांचे दालनात पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे,नायब तहसिलदार के.टी.भिंगारे उपस्थित होते.म्हसळा व्यापारी वर्गातर्फे निवेदन देण्यासाठी जेष्ठ नागरिक हिंदु समाज अध्यक्ष सुभाष करडे, मुस्लिम समाज अध्यक्ष महमदअली पेणकर,माजी सभापती महादेव पाटील,व्यापारी संघटना प्रमुख सुरेश जैन,योगेश करडे,रणजित जैन,शाहिद उकये,माजी नगरसेवक बाबाजान पठाण,नाझीम चोगले,मुब्बशीर जमादार,मुसद्दीक इनामदार,सलीम बागकर,वसीम कोदरे,सुशिल यादव,बाबु शिर्के आदी मान्यवर व्यापारी उपस्थित होते.कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाच्या नियमांचे व्यापारी वर्गाकडून नक्कीच पालन होईल आणि ते आवश्यकच असल्याचे निवेदनात नमुद करताना गेले वर्षभरात भरडून गेलेला सर्वसामान्य व्यापारी,मजूर,नोकरदार उभारी घेत असताना पुन्हा झालेल्या लॉक डाऊन मध्ये तो अधिकच डाऊन होणार आहे.रोज कमवून उदरनिर्वाह करणारे व्यापारी आणि नोकरदारांना याचा मोठा फटका बसणार आहे त्यांची उपासमारी होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी गोर गरिबांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असे म्हसळा तालुका शहरातील व्यापारी वर्गाने निवेदनात नमुद केले आहे. 

- अत्यावश्यक सेवा असलेल्यानी व्यापार करायचे आणि बाकीच्यानी फक्त नियम पाळायचे तेव्हा सर्वात खरा किराणा व्यापार  बरा अशी चर्चा व्यवसाय बंद असलेले व्यापारी वर्गात ऐकायला मिळत होती.

No comments:

Post a Comment