कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लावलेले निर्बंध कडक करा ; क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी -सभापती रामराजे नाईक निंबाळकर - - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, April 3, 2021

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लावलेले निर्बंध कडक करा ; क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी -सभापती रामराजे नाईक निंबाळकर -

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लावलेले निर्बंध कडक करा ; क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी -सभापती रामराजे नाईक निंबाळकर - 

प्रतिक मिसाळ -सातारा



सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे.त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत . तसेच स्व . क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवा , अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केल्या . जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी ते बोलत होते . या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील , गृह ( ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई , खासदार श्रीनिवास पाटील , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले , आमदार शशिकांत शिंदे , आमदार मकरंद पाटील , आमदार दिपक चव्हाण , जिल्हाधिकारी शेखर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते . तरुणांना जास्त प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे . जिल्ह्यातील तरुणांनी शासनाने तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे , असे आवाहन करुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर पुढे म्हणाले , जो कोणी नियमांचे पालन करणार नाही अशांवर कारवाई करावी . रुग्णांची संख्या वाढत आहे कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही तसेच रुग्णास सहजपणे बेड उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी , अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या . कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे . रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करावे , अशा सचूना करुन पालकमंत्री श्री . पाटील पुढे म्हणाले , शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी . मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी . तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे . तसेच रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी . लग्न समारंभ , बार , रेस्टॉरंट यांच्यावर पोलीस विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल . ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तात्काळ कारवाई करण्यात येईल , असे गृह राज्यमंत्री श्री . देसाई यांनी या बैठकीत सांगितले .



 स्व . क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णलयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा , या लॅबसाठी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील या बैठकीत सांगितले . यावेळी आमदार शशिकांत शिंदे , आमदार मकरंद पाटील , आमदार दिपक चव्हाण यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या . या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुभाष चव्हाण , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment