Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर केलं सर

गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर  केलं सर

हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला

               प्रियांका ढम-पुणे


साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर  सर केले  आणि ती हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.तर जाणून घेऊया, तिने आणि तिच्या संपूर्ण टीम ने हे उत्तुंग यशाचं शिखर गाठण्यासाठी काय काय अडचणींचा सामना केला आणि हे महाराष्ट्रातील मावळे कसे यशस्वी झाले याची यशोगाथा आपण आज महाराष्ट्र मिरर मधे पाहणार आहोत ....

 शुक्रवारी  म्हणजेच १६ एप्रिल रोजी दुपारी प्रियांकानं हे शिखर सर केलं. तिच्यासोबत टीममधील भगवान चवले आणि केवल कक्का यांनीही शिखर सर केलं.

विशेष म्हणजे त्याआधी शुक्रवारीच दुपारी 2.15 मि. पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या तीन गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा-1 वर यशस्वी चढाई केली होती. गिरीप्रेमी च्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमीत मांदळे आणि जीतेंद्र गावरे यांनी शिखरावर यशस्वी चढाई केली तर ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं . 8,091 मीटर उंचीचं हे शिखर सर करणारी गिरीप्रेमी ही भारतातली पहिली नागरी संस्था ठरली आहे.

https://youtu.be/7TLAdQMjHjM

अन्नपूर्णा-1 हे शिखर उंचीच्या मानानं जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र ते सर्वात खडतर शिखर मानलं जातं. गंडकी आणि मार्श्यंगदी या हिमनद्या  सुद्धा इथूनच वाहतात. नासा अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार हिमालयातल्या वेगवान वाऱ्यामुळे सतत हिमस्खलनाचा धोका याठिकाणी आहे यामुळे अन्नपूर्णा रेंजमध्ये कुठल्याही शिखरावर चढाई सोपी नाही. म्हणूनच इथे आजवर अडीचशेच्या आसपास गिर्यारोहकांनाच यशस्वी चढाई करता आली आहे.



 महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांचं हे यश आणखी विशेष ठरतं, कारण कोव्हिडच्या साथीच्या काळात ही मोहीम त्यांनी पार पाडली आहे. लॉकडाऊनची अनिश्चितता, तयारीसाठी मिळालेला मर्यादित वेळ, कोरोना विषाणूची भीती,* अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. म्हणतात ना इच्छा आणि जिद्द त्याचबरोबर कष्ट घेण्याची तयारी असली की कोणतंच काम अवघड नसत त्याच प्रमाणे

गिरीप्रेमीनं सर केलेलं हे आठ हजार मीटर उंचीवरचं आठवं हिमशिखर ठरलं आहे. याआधी 2012 साली गिरीप्रेमीनं एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर ल्होत्से, मकालू, च्यो ओयू, धौलागिरी, मनास्लू आणि कांचनगंगा ही शिखरंही त्यांनी सर केली आहेत.



तर प्रियंकानं याआधी माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, माऊंट मकालू अशी शिखरं सर केली होती. माऊंट मकालू सर करणारीही ती पहिली भारतीय महिला ठरली होती. ती म्हणते ,स्त्रियांमध्ये एक विशेष ऊर्जा आहे ताकद आहे त्याचा फक्त योग्य वापर होणे गरजेचे आहे स्त्री मधे खूप शक्ती आणि साहस आहे कारण  त्या दिवसात किती वेदना असतात मूड स्विंग्ज असतात तरीपण मी शिखर सर केले कारण खरचं महिला कणखर असतात ... 

अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर करून दाखवलं आणि ही मराठमोळी प्रियांका अन्नपूर्णा शिखर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली ही खरचं कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे ....प्रियांका सारख्या अनेक मुली महाराष्ट्रातून तयार व्हाव्या आणि हिमकन्या म्हणून ओळखल्या जाव्या महाराष्ट्र मिरर टीमकडून     खूप खूप अभिनंदन आणि  पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .....




Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies